Tuesday, 8 March 2016

ई-मेल सुविधेचा शोध लावणारे रे टॉमलिन्सन कालवश

ई-मेल सुविधेचा शोध लावणारे रे टॉमलिन्सन कालवश

आपल्या ई-मेलच्या अद्वितीय शोधाद्वारे जगाच्या संदेशवहनात क्रांती करणारे रे टॉमलिन्सन यांचे शनिवारी निधन झाले.
ray-tomilson_6वॉशिंग्टन - आपल्या ई-मेलच्या अद्वितीय शोधाद्वारे जगाच्या संदेशवहनात क्रांती करणारे रे टॉमलिन्सन यांचे शनिवारी निधन झाले. हे ई-मेल संदेशवहन अत्यंत सोपे व सहज करण्यासाठी लागणा-या <\@> या चिन्हांची निवडही त्यांनीच केली होती.
१९७१ मध्ये टॉमलिन्सन यांनी थेट इलेक्ट्रॉनिक्स संदेशाचा शोध लावला. त्यापूर्वी मर्यादित स्वरूपात लेखी संदेश पाठवू शकत होते. जेव्हा संगणक जोडण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत होता, त्यावेळी टॉमलिन्सनने क्रांती घडवून जगाचे संदेशवहनाचे चित्र बदलून टाकले. १९९० पासून ई-मेलच्या वापराला मोठय़ा प्रमाणावर प्रारंभ झाला. आता तर जगाचा संपूर्ण व्यवहार ई-मेलवरच अवलंबून आहे.
टॉमलिन्सन यांचे शिक्षण रेनसिलिअर पॉलिटेक्निक इन्स्टिटय़ूट व मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतून झाले. अमेरिकेच्या संरक्षण खात्यात काम करत असताना त्यांनी एका संगणकातून दुस-या संगणकात संदेश पाठवण्याचा प्रयोग केला. त्यावेळी कोणते शब्द पाठवले हे त्यांच्या लक्षात नव्हते. पण, तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मी समाधानी झालो. त्यानंतर मी माझ्या सहका-यांना नेटवर्कद्वारे संदेश कसे पाठवायचे याचे शिक्षण दिले, असे टॉमलिन्सन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.

यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...