Tuesday, 20 September 2022

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८वी) परीक्षेची इयत्ता व विषयनिहाय अंतिम उत्तरसूची

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८वी) परीक्षेची इयत्ता व विषयनिहाय अंतिम उत्तरसूची www.mscepune.in व https://www.mscepuppss.in वर जाहीर करण्यात आल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

Monday, 1 August 2022

राष्ट्रकुलमध्ये भारताला दुसरं गोल्ड मेडल; जेरेमी लालरिनुंगाची सोनेरी कामगिरी

राष्ट्रकुलमध्ये भारताला दुसरं गोल्ड मेडल; जेरेमी लालरिनुंगाची सोनेरी कामगिरी
बर्मिंगहम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आज पाचवं पदक मिळालं आहे. जेरेमी लालरिनुंगा याने पुरुषांच्या वेटलिफ्टिंग ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. १९ वर्षीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिननुंगा यानं कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलंय. कॉमनवेल्थ गेम्समध्ये हे भारताला मिळालेलं दुसरे गोल्ड मेडल आहे. जेरेमी लालरिनुंगाने एकूण ३०० किलो वजन उचलून विक्रम केला. भारताला मिळालेलं हे दुसरे सुवर्णपदक असून स्पर्धेतील एकूण पाचवे पदक आहे. विशेष म्हणजे ही पाचही पदके भारतानं वेटलिफ्टिंग स्पर्धेतच मिळवली आहेत. २०१८ च्या युवा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या जेरेमी लालरिननुंगानं स्नॅचमध्ये विक्रमी १४० किलोग्रॅम वजन उचलले, तर त्यानं क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचललं. म्हणजेच जेरेमीनं एकूण ३०० किलो वजन उचललं. जे दुसऱ्या क्रमांकाच्या समोआ या प्रतिस्पर्ध्यापेक्षा ७ किलोहून अधिक होते. भारताला एकूण ५ मेडल वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आतापर्यंत एकूण ५ मेडल्स मिळाले आहेत. मीराबाई चानूने गोल्ड मेडल, संकेत सरगर आणि बिंदियाराणी यांनी सिल्वर मेडल तर गुरुराजाने ब्रॉन्ज मेडल पटकावलं आहे. source:OTT News

Sunday, 31 July 2022

राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूने रचला इतिहास

राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूने रचला इतिहास; गोल्ड मेडल जिंकत नवा विक्रम केला नावावर
    भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. मीराबाईने राष्ट्रकुल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. तिने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदकही जिंकले आहे. तिने स्नॅचमध्ये ८८ किलो वजन उचलले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये या खेळाडूने स्नॅचमध्ये ८४ किलो वजन उचलले. यानंतर तिने पहिल्याच प्रयत्नात क्लीन अँड जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलले. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली असून तिन्ही पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. ३० जुलै रोजी संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या ५५ किलो गटात रौप्य पदक जिंकले. त्यानंतर गुरुराजा पुजारीने ६१ किलो गटात कांस्यपदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे १२८ वे पदक आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूचे अभिनंदन केलंय. “असाधारण मीराबाई चानूने पुन्हा एकदा भारताला गौरवलं! बर्मिंगहॅम गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून नवीन कॉमनवेल्थ विक्रम प्रस्थापित करताना प्रत्येक भारतीय आनंदी आहे. तिचे यश अनेक भारतीयांना, विशेषत: नवीन खेळाडूंना प्रेरणा देते.” असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत मीराबाई चानूचे अभिनंदन केले. @The Hitavada

यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...