चालू घडामोडी
देश-विदेश
प. बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पुदुचेरीत विधानसभा निवडणुका जाहीर
# पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांसह केंद्रशासित पुदुचेरीत ४ एप्रिल ते १६ मे या कालावधीत विधानसभा निवडणूक होणार आहे. १९ मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
# पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान होईल. आसाममध्ये ४ व ११ एप्रिल अशा दोन टप्प्यांत, तर केरळ, तामिळनाडू व पुदुचेरीत एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होईल. या वेळी पहिल्यांदाच मतदान यंत्रावर ‘नोटा’(कोणालाही मत नाही) नोंदविण्यासाठी खास चिन्ह असेल.
मनोज कुमार यांना ‘फाळके पुरस्कार’
# बुजूर्ग हिंदी चित्रपट कलावंत, निर्माता, पटकथाकार आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने गौरविले जाणार आहे.
# ‘भारतरत्न’ खालोखाल सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून प्रतिष्ठा लाभलेल्या या पुरस्कारात सुवर्णकमळ, दहा लाख रुपये रोख आणि शाल यांचा समावेश आहे. ७८ वर्षीय मनोज कुमार हे या पुरस्काराचे ४७ वे मानकरी आहेत. १९९२मध्ये पद्मश्री किताबाने त्यांचा केंद्र सरकारने गौरव केला होता.
पाकिस्तानातील अबोटाबाद येथे जन्मलेले मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी. १९५७मध्ये ते चित्रपट सृष्टीत आले.
# ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी जाणकारांच्या समितीकडून निवड केली जाते. यंदा लता मंगेशकर, आशा भोसले, सलीम खान, नितीन मुकेश आणि अनूप जलोटा या पाच सदस्यीय समितीने ही निवड केली.
महाराष्ट्र
दुष्काळग्रस्त २१ जिल्ह्य़ांत विजेसाठी १ हजार कोटी
# राज्यात २१ जिल्ह्य़ांतील १५ हजार ७४७ दुष्काळग्रस्त गावांसाठी शेतीसाठी लागणाऱ्या विद्युत पायाभूत सुविधा व विद्युत प्रणालीचे सक्षमीकरण व बळकटीकरण्यासाठी शासनाने वीजवितरण कंपनीला अनुदान स्वरूपात दिलेल्या १ हजार १९ कोटी १ लाख रुपयांपकी यवतमाळ जिल्ह्य़ाच्या वाटय़ाला फक्त १३ लाख, तर तर सर्वात जास्त म्हणजे, ५५१ कोटी ५६ लाख रुपये औरंगाबाद विभागाच्या वाटय़ाला आले आहेत.
मुंबई संघात जय बिस्तला संधी
# नुकताच रणजी क्रिकेट स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने इराणी चषक स्पध्रेसाठी जाहीर केलेल्या संघात सलामीवीर जय बिस्तला संधी देण्यात आली आहे. मुंबईला रविवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर शेष भारत संघाचा सामना करावा लागणार आहे.
# रणजी करंडक स्पध्रेत झारखंडविरुद्धच्या सामन्यात अपयश आल्यानंतर बिस्तला संघातील स्थान गमवावे लागले होते. त्यानंतर २३ वर्षांखालील सी. के. नायडू स्पध्रेच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध त्याने द्विशतक झळकावून मुंबई संघासाठी दावेदारी सांगितली. त्याला अंतिम १६ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे.
क्रिडा
नेमबाजी विश्वचषक स्पध्रेत जितू रायला सुवर्णपदक
# जितू रायने बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
# गेल्या दोन वर्षांत जितूने नेमबाजी विश्वचषकात सलग पाच वेळा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. यादरम्यान त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकावर कब्जा केला आहे. जितूने १९१.३ तर वेईने १८६.५ गुण मिळवले. चीनच्याच वांग झिवेईने १६५.८ गुणांसह कांस्यपदकावर नाव कोरले. भारताच्या प्रकाश नानजप्पाने पात्रता फेरीत ५४९ गुणांसह १७वे स्थान मिळवले.
क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांचे निधन
# न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांचे गुरुवारी पहाटे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.
# गेली चार वर्षे ते कॅन्सरशी झगडत होते. त्यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. सध्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या टी- २० क्रिकेटची संकल्पना सर्वात पहिल्यांदा मार्टिन क्रो यांनीच मांडली.
एफसी गोवा क्लबला ५० लाखांचा दंड
# इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पध्रेच्या बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय एफसी गोवा क्लबला चांगलाच महागात पडला असून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) त्यांना ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.
# गेल्या डिसेंबर महिन्यात अंतिम सामन्यात चेन्नईयन एफसीने ३-२ अशा फरकाने गोवाचा पराभव केला होता. त्यानंतर या सामन्याचा निकाल आधीच निश्चित असल्याचा आरोप करत गोवा क्लबने बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार घातला होता.
अर्थसत्ता
‘६ लाख कोटींची गुंतवणूक शक्य’
# ‘मेक इन इंडिया’ सप्ताहादरम्यान सर्वाधिक रकमेचे आणि संख्येच्या करारांचा विक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने प्रत्यक्षात ६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत विश्वास व्यक्त केला आहे. या दरम्यान करण्यात आलेल्या करारांपैकी ७५ टक्के रक्कम नक्कीच प्रत्यक्षात येईल, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) वतीने आयोजित परिषदेदरम्यान देसाई बोलत होते.
नैसर्गिक वायू दरात ६० टक्क्यांपर्यंत वाढीसाठी सरकारची अनुकूलता
# दुर्गम ठिकाणच्या अविकसित वायू संशोधनांतून उत्पादित नैसर्गिक वायूच्या दरात ६० टक्क्यांपर्यंत वाढीचा मानस केंद्र सरकारने बनविला असून, ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या कंपन्यांसाठी ही बाब प्रोत्साहनकारक ठरेल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही दोन स्तरीय दररचनेच्या स्वातंत्र्याची घोषणा नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पातून केली आहे.
# भारतातील नैसर्गिक वायूच्या किमती या प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटसाठी ३.८३ अमेरिकी डॉलर इतकी असून, ती एप्रिलमध्ये ३.१५ डॉलपर्यंत खाली येईल.