RESULT Class VI JNVST 2023
Click below link to view the Result for class VI JNVST 2023
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर click करून पाहता येईल
To view result click here Class VI JNVST 2023
Click below link to view the Result for class VI JNVST 2023
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर click करून पाहता येईल
To view result click here Class VI JNVST 2023
जवाहर नवोदय विद्यालय ही 100% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती. ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जाते .
येथे भारतातील काही विशेष, गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते ! या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी - प्रत्येक जिल्यातून विद्यार्थी एक परीक्षा देतात ज्या परीक्षेत top 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6वी - 12वी मोफत शिक्षण मिळते. ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात.
NVS प्रवेश 2024-25: नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे..
• नवोदय प्रवेश परीक्षा सन 2024 (इ 6वी ] शनिवार, 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वा.
• ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.
Jawahar Navodaya Vidyalaya Admission 2024-25
नमस्कार मित्रांनो, - आज आपण या लेखात NVS(Jawahar Navodya Vidyalaya) सत्र 2024- 25 इयत्ता 6 वीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती पाहणारआहोत. नवोदय विद्यालयातील प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नवोदय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून यामध्ये इयत्ता ५ वीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. NVS 2024-25 इयत्ता 6 वी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश 2024 | Navodaya Vidyalaya Admission 2024
नवोदय विद्यालयाने सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे.अनेक दिवसांपासून आपल्या मुलांच्या प्रवेशाची वाट पाहणाऱ्या पालकांना नवोदय विद्यालयात ऑनलाइन प्रवेश भरता येणार आहे.ज्याची लिंक आता NVS अधिकृत पोर्टलवर NVS प्रवेश लिंक सक्रिय (आता) करण्यात आली आहे.
नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वीच्या वर्गात प्रवेश प्रक्रिया कशी असते हे या लेखात जाणून घेऊया ? कसे भरावे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, सर्व माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा पर्यंत करत आहोत.
● उमेदवाराला JNVST साठी फक्त एकदाच अर्ज करण्याची परवानगी आहे. नोंदणी डेटाच्या पडताळणीदरम्यान, उमेदवाराने मागील वर्षांमध्ये अर्ज केल्याचे आढळल्यास, उमेदवाराचा उमेदवारी अर्ज नाकारला जाईल. नाकारण्याबाबतचा एसएमएस नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल.
जाणून घेऊया नवोदय फॉर्म कसे भरावे.
नवोदय इयत्ता 6 वी प्रवेश 2024 साठी पात्रता.
Eligibility for Jawahar Navodaya vidyalaya for Class 6th Admission 2024
• १ . JNVST 2024 नोंदणीसाठी, विद्यार्थ्यांचे वय 9 ते 13 वर्षे दरम्यान असावे.
• २. सत्र 2023-24 या सत्रामध्ये इ.५ व्या प्रवेश घेणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना:
1). या वर्षापासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त एक टप्पा असेल.
2). ओबीसी उमेदवारांना दिलेल्या आरक्षणांची यादी केंद्रीय यादीनुसार लागू केली जाईल. केंद्रीय यादीमध्ये समाविष्ट नसलेल्या ओबीसी उमेदवारांनी सामान्य उमेदवार म्हणून अर्ज करावा.
3). अर्ज भरण्यापूर्वी खालील स्कॅन केलेल्या प्रती तयार ठेवा.
1. उमेदवाराची सही,
ii. पालकांची सही,
iii. उमेदवाराचे छायाचित्र
iv. पालक आणि उमेदवाराने प्रमाणपत्र.सही केलेले
V. Residence certificate
vi. OBC certificate (प्रवेश घेते वेळी लागेल)
V. प्रतिमांचा आकार फोटो आणि स्वाक्षरीसाठी 10-100kb आणि प्रमाणपत्रासाठी 50-300kb दरम्यान असावा.
4) पुढील तपशीलांसाठी कृपया प्रॉस्पेक्टस वाचा
Link- JNV prospectus
5) नवोदय परीक्षेसाठी अर्ज करणारा विद्यार्थ्यांचा पत्ता हा नवोदय विद्यालय ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यातील पत्ता असणारा असावा.
6) नवोदय फॉर्म भरताना आधार कार्ड किंवा पत्त्यांचा पुरावा द्यावा सबमिट करावा लागणार आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश 2024 साठी अर्ज कसा करावा? | How to Apply for Navodaya Vidyalaya Admission 2024?
• 1. सर्व प्रथम अर्जदारांनी प्रवेशासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.CANDIDATE CORNER बघावे.
2. यानंतर Click here for Class VI Registration च्या पर्यायावर क्लिक करा.
• 3. त्यानंतर ONLINE APPLICATION FOR ADMISSION TO CLASS VI (2024-25) ऑनलाइन फॉर्ममध्ये तुमचे सर्व वैयक्तिक तपशील भरा.
• 4. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक भरा.
•5. त्यानंतर OTP येईल, त्याची पडताळणी करा.
• 6. त्यानंतर तुम्हाला तुमची पावती तुमच्या समोर दिसेल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक(JAWAHAR NAVODAYA VIDYALAYA SELECTION TEST 2024)
लिंक 1. Click here
Direct Registration Link - Click Here
अंतिम मुदत - 10 ऑगस्ट 2023
Last Date to Apply 10.08.2023
JNVST प्रवेश 2024 साठी जागा आरक्षणाचे निकष.
Seat Reservation Criteria for JNVST Admission 2024
• 75% जागा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून निवडलेल्या अर्जदारांसाठी राखीव आहेत आणि उर्वरित जागा जिल्ह्यातील शहरी भागातील अर्जदारांसाठी राखीव आहेत.
• SC ST उमेदवारांसाठी त्यांच्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात जागांचे आरक्षण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी नसावे.
•1/3 जागा विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत.
•0.3% जागा अपंग मुलांसाठी देखील राखीव आहेत.
(शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इयत्ता पाचवीत शिकत असलेले उमेदवार त्याच जिल्ह्यातील प्रामाणिक रहिवासी असलेले तसेच त्याच जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळा जिथे JNV कार्यरत आहे आणि ज्यामध्ये ते प्रवेश घेऊ इच्छित आहेत तेथील रहिवासी असावेत).
सेल्फ स्टडी करत कल्पेशने सीईटी(CET PCM) परीक्षेत मिळविले उत्तम यश
तळोधी(बा) लगत असलेल्या नवानगर येथील कल्पेश शंकर मेश्राम याने सीईटी प्रवेश परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले आहे.तळोधी(बा) येथील सामान्य कुटुंबातील शंकर मेश्राम यांचा कल्पेश हा मुलगा आहे.त्यांची बहीण सोनिया नागपूर येथे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग शिक्षण घेत आहे.सोनिया व कल्पेशने तळोधी(बा) येथील लोकविद्यालयातुन इ.१० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
त्याने लोकविद्यालयातून दहावीची परीक्षा 94.40 टक्के गुणासह उत्तीर्ण केली होती.पुढील 12वी चे शिक्षण डॉ.आंबेडकर कॉलेज नागपूर येथून पूर्ण केले.परिस्थितीमुळे त्याला शिकवणी वर्ग लावणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने सेल्फ स्टडी करत अभ्यास सुरू केला.पहिल्या प्रयत्नात त्याला सीईटी प्रवेश परीक्षेत कमी गुण प्राप्त झाल्यामुळे पुन्हा त्याने प्रयत्न सुरू केले. कोणत्याही शिकवणी वर्गाशिवाय(कोचिंग क्लासेस)त्याला दुसऱ्या प्रयत्नात सीईटीमध्ये 96.48% गुण प्राप्त केले.त्याला मुंबई येथील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.त्याला भविष्यात सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचे आहे .त्यांचा निकाल लागताच आईवडीलांनी त्याचे कौतुक केले आहे.त्याच्या यशाबद्दल लोकविद्यालय तळोधी(बा) येथील शिक्षक व माजी विद्यार्थी समूहाने कौतुक केले आहे.त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक वाढला आहे
शेतकऱ्याचा मुलगा सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर
यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचायचं नाही, हा शिरस्ता पाळणाऱ्यांना आयुष्यात फार कठीण काळ पहावा लागत नाही. आयएएस अधिकारी वीर प्रताप सिंह राघव यांनी दाखवून दिलं की प्रतिभा आणि श्रीमंती यांचा काहीही संबंध नाही. बालपणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आयुष्य व्यतीत केलेले आयएएस ऑफिसर वीर प्रताप सिंह राघव आता तामिळनाडूत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
राघव यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्यांचं बालपण हलाखीत गेलं. राघव यांच्या मार्गात अनेक अडथळे असूनही त्यांनी आपल्या लक्ष्याचा पाठपुरावा केला. वीर प्रताप सिंह राघव यांनी मेहनतीच्या जोरावर UPSC परीक्षेत देशात ९२ वा रँक मिळवला. वीर प्रताप सिंह राघव हे उत्तर प्रदेशातील दलपतपूर गावातील मूळ रहिवासी आहेत. UPSC नागरी सेवा परीक्षेत ते तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले. देशात ९२ वं स्थान पटकावून त्यांनी इतिहास रचला. करौरा येथील आर्य समाज शाळेत वीर प्रताप यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, तर शिकारपूरमधील सूरजभान सरस्वती विद्यामंदिर येथे सहाव्या इयत्तेपासून ते माध्यमिक शाळा शिकले.
वीर प्रताप हे एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले. त्यांना लहानपणापासूनच गरिबीचा सामना करावा लागला होता, तरीही शिकण्याची इच्छा आणि जिद्द अंगी असल्यामुळे त्यांनी आयएएस होण्याचं स्वप्न उरी बाळगलं. वीर प्रताप यांच्या मोठ्या भावाचीही आयएएस होण्याची इच्छा होती, परंतु आर्थिक स्थितीमुळे त्यांनी सीआरपीएफमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.त्यांचे वडील सतीश राघव हे दलपतपूरच्या बुलंदशहर गावात राहणारे अल्पभूधारक शेतकरी आहेत. पूर्वी, त्यांची सर्व मजुरी त्यांच्या कुटुंबाचं पोट भरण्यात जात असे. यानंतर वडिलांनी मुलाला यूपीएससीच्या तयारीसाठी मदत व्हावी म्हणून कर्जाने पैसे घेतले.
वीर प्रताप यांना आपल्या घरापासून प्राथमिक शाळेत जाण्यासाठी दररोज पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत असे. अभ्यासासाठी ते दररोज १० किमीचा प्रवास करायचे. गावात पूल नसल्याने ते नदीतून जात असत. पुढे अलीगढ मुस्लिम विद्यापीठात वीर प्रताप यांनी २०१५ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकची पदवी मिळवली.
वीर प्रताप राघव यांनी मुख्य परीक्षेत तत्त्वज्ञान विषयात द्वितीय क्रमांक पटकावला. तत्त्वज्ञानात त्यांनी ५०० पैकी ३०६ गुण मिळवले.
वीर प्रताप यांनी २०१६ आणि २०१७ मध्येही परीक्षा दिली होती, मात्र ते अयशस्वी ठरले. निकालामुळे ते निराश झाले होते, परंतु त्यांनी संयम राखला. शेवटी २०१९ मध्ये चिकाटीमुळे त्यांनी यश खेचून आणले.
MPSC चा अंतिम निकाल जाहीर, शेतकऱ्याची मुलगी राज्यात पहिली
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला.या परीक्षेत बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सोनाली अर्जुन म्हात्रे या शेतकऱ्याच्या मुलीने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरी तर मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सोनालीच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोनाली मात्रेचे वडील शेतकरी असून एका शेतकरी कन्येने हे यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
तर प्रमोद बाळासाहेब चौगुले याने सर्वसाधारण उमेदवारांमधून राज्यात पहिला क्रमांत पटकावला आहे. तसेच विशाल महादेव यादव हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे. या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली होती आणि त्यानंतर आता याच मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
Online ITI Admission Process - 2023 केंद्रीय ऑनलाईन आय. टी. आय प्रवेश प्रक्रिया - 2023

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश (ITI Admission 2023] प्रक्रिया सोमवार 12 जून 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
[ITI Admission 2023) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात
https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ITI Admission 2023 अर्ज स्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे आदी प्रक्रियेबाबत समुपदेशन सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोज आयोजित करण्यात येणार आहेत.
माहिती पुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया (ITI Admission 2023] राबविण्यात येणार असून त्यासंदर्भातील वेळापत्रक तसेच राज्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ www.dvet.gov.in व
https://admission.dvet.gov.in यासह प्रादेशिक कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, सर्व शासकीय, खासगी प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ..
नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक. ...