Tuesday, 14 February 2023
तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
इयत्ता ५वी ते १२ वी ची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे.या पार्श्वभूमीवर विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांना मानसशास्त्रीय मार्गदर्शन करणारी,विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तंत्र समजावून देणारी आणि हमखास यशस्वी होण्याचे रहस्य सांगणारी प्रयोगशील लेखमाला ...
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रानो *आज आपण या भागात शिकणार आहोत अभ्यासात एकाग्रता टिकविण्यासाठी विविध अभ्यासतंत्राचा वापर कसा करावा*<
त्राटक तंत्र._
या त्राटक तंत्राचा वापर करून**अभ्यासात एकाग्रता तयार करण्यासाठी उपयोग करतो आहे.आपणासही तो व्हावा त्यासाठी हे तंत्र मी संक्षिप्त स्वरूपात आपणास सांगत आहे.
*त्राटकचा मूळ अर्थ अश्रू असा आहे... डोळ्याची पापणी न लावता,डोळ्यातील अश्रू रोखून एकटक बिंदूकडे पहाणे म्हणजे बिंदू त्राटक होय.
तसे बिंदू त्राटक,अग्र त्राटक,ज्योती त्राटक,शक्ती त्राटक,केंद्र त्राटक,चंद्र त्राटक आणि सूर्य त्राटक असे त्राटकाचे ७ प्रकार पडतात.एक एक प्रकार शिकून त्याचा नित्य सराव करून त्याची परीक्षा घेवून पुढील प्रकार शिकायचे असतात.
त्राटक हा योग धारणेचा एक भाग असून स्वसंमोहन शास्त्र शिकण्यासाठी प्रथम हे शिकावे लागते.आपली अभ्यासात एकाग्रता टिकावी,स्मरण वाढावे म्हणून मी आपणास बिंदू त्राटक कसे करायचे ते थोडक्यात सांगणार आहे.
प्रथमतः त्राटक करण्याचे फायदे पाहू....
*त्राटक करण्याचे फायदे*_
☄ *आपले मन चंचल असते. मनाच्या चंचलतेमुळे,मनाच्या भरकटलेपणामुळे आपली एकाग्रता होत नाही,त्राटकामुळे मनाची चंचलता पूर्ण थांबून एकाग्रता वाढते.*
☄ *मन एकाग्र करण्याच्या सवयीमुळे आपली श्रवण शक्ती विकसित होते.*
☄ श्रवण शक्ती विकसित झाली की आकलन निट होते.
☄ आकलन निट झाले की अभिरुची वाढते.
☄ अभिरूची वाढल्यावर आपोआपच स्मरण वाढते.
☄ सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या ध्येयाप्रत जाण्याची इच्छाशक्ती प्रबळ होते.
☄ दिवसातील केवळ १० मिनीटे त्राटक केल्यास २४ तास अलर्ट रहाण्याची सवय लागते.
☄ केवळ मुलांनी अभ्यासाठीच नव्हे तर पालकांनी ,थोरा मोठयांनीही मन स्थिर रहाण्यासाठी त्राटक करणे फायदेशिर आहे.
☄ नित्य त्राटक केल्याने डोळे सतेज होतात, डोळ्यांची शक्ती वाढते.
त्राटकाचे प्रकार कोणकोणते?
१) बिंदु त्राटक –
भिंतीवर असलेल्या ठिपक्याकडे, किंवा कर्व्ह लाईन्स असलेल्या डिझाईनच्या अंतर्भागी असलेल्या बिंदुकडे एकटक पाहणं, याला बिंदु त्राटक म्हणतात.डिझाईनचे काही प्रकार मी सोबत दिले आहेत.याला थर्ड आय एक्टीव्हेशन असेही म्हणतात.कागदावर स्थिर असलेली डिझाईन सतत काही मिनीटे एकाग्रतेने पाहील्यामुळे गोल गोल फिरल्याचा आभास होतो.
२) तारा त्राटक
जर तुमच्याकडे एकांत असलेली रुम नसेल, तर तुम्ही रात्रीच्या वेळी गच्चीवर जाऊन आरामखुर्ची वर झोपा. एक तारा निवडा. आता त्याच्याकडे एकटक बघत रहा.
३) ज्योती त्राटक –
यात मेणबत्तीच्या ज्योतीवर चित्त एकाग्र करतात. खुप मजा येते.ज्योतीचे तीन भाग असतात,लाल,पिवळा आणि निळा.प्रत्येक हवेच्या झोताबरोबर तिचे हेलकावे खाणं, बघत
रहा!कित्येक मिनीटांनंतर तर ज्योत वेगवेगळ्या प्रकाराचे आकार धारण करते.सरावाने नंतर वेळ कसा गेला हे कळत नाही.
मी वापरलेला,आणि मला सर्वात जास्त आवडलेला प्रकार आहे हा!सुरुवातीला ३० सेकंदात डोळे बँद करा..१ मिनिट तसेच डोळे बंद ठेवा.परत ३० सेकंद टक लावा ज्योतीला. परत १ मिनीट डोळे बंद करा असं ४-५ मिनिटे दिवसाला करा.आणि सरावानुसार एकटक पाहण्याचा वेळ वाढवा.
४) प्रतिबिंब त्राटक –
हे आरशात बघुन करायचे असते, स्वतःच्या डोळ्यात एकटक बघत! हे मी जास्त कधी करुन बघितले नाही.मला माझ्या कडे बघितले की हसु येते.कारण मी पुन्हा कधी सांगेन.
त्राटक केल्याचे फायदे –
- त्राटक केल्याने एकाग्रता वाढते.फोकस डेव्हलप होतो. उदा. वाचलेले चटकन समजते.
- मन निर्मळ होते.जुनी ओझी नष्ट होतात.आतमध्ये आनंदाचे झरे फुटतात.
- डोळे नितळ झाल्याने,चेहरा सुंदर दिसु लागतो.व्यक्तिमत्व प्रभावी बनते.
- डोळ्यात तेज निर्माण होते.जेव्हा आपण एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालुन बोलतो,तेव्हा आपण दिलेली आज्ञा त्याला नाकारता येत नाही.
- त्राटक करणार्या माणसांनी अगदी अनोळखी लोकांच्या डोळ्यात डोळे घालुन मनातल्या मनात आज्ञा दिल्यास सुद्धा ते आपलेसे होतात.
- त्राटक, ध्यान केल्याने ऑरा म्हणजे आपल्या भवतीचे वलय स्वच्छ होतात.आपोआपच आपण शुभ गोष्टींना आकर्षित करुन घेतो.अशुभ,अनिष्ठ घटना आणि माणसं आपल्यापासुन दुर दुर पळतात.
- चिडचिड, निराशा संपते.
- नवनव्या कल्पना सुचु लागतात.
- काही वर्ष त्राटक केल्यावर डोळ्यांमध्ये सुपरपावर येते, असं म्हणतात.चमत्कार घडवता येतात,असेही अनुभव आहे.
बिंदू त्राटक करण्याची पद्धत_
👁आपण जिथे बसणार आहात त्या समोरच्या भिंतीवर एका कोऱ्या कागदावर २ इंच व्यासाचे वर्तुळ काढून ते काळ्या रंगाने रंगवावे व ते भिंतीवर आपण बसल्यावर समान रेषेत दिसेल असे चिकटवावे.
👁रात्री पूर्ण विश्रांती घेवून पहाटे लवकर उठावे.प्रातःविधी आटोपून साध्या किंवा पद्मासनात भिंतीवरील काळे वर्तूळ आणि आपले डोळे यात किमान ५ फुटाचे अंतर ठेवून शांत बसावे.
👁दिर्घ श्वास घेवून मनातले सगळे वाईट साईट विचार उच्छ्वासा बरोबर काढून टाकावेत.*
👁दिर्घ श्वास घेताना माझे मन एकाग्र होणार आहे अशी सूचना द्यावी.
👁पापणी न लवता त्या वर्तुळाच्या मध्य बिंदूकडे एकटक पाहत रहा.
👁 प्रथम प्रथम सराव नसलेने डोळ्यातून अश्रू येतील,पापण्यांची उघडझाप होईल तरीही न थांबता जास्तीत जास्त १० मिनीटे बसा.*
👁 प्रथम काही दिवस ते वर्तुळ फिरल्याचा भास होईल नंतर नंतर ते वर्तुळ स्थिर होईल.त्यावेळी समजायचे की, आपले मन स्थिर होत आहे.*
👁हे बिंदू त्राटक केवळ मुलांनीच नाही तर पालकांनीही करावे.*
👁 आपल्या शारीरिक व मानसिक कुवती नुसार बिंदू त्राटक १ मिनिटापासून कितीही वेळ करू शकता जेथे डोळयांच्या पापण्या लवतिल तेथे त्राटक संपले असे समजावे.
👁चष्मा असेल तर तो काढून बिंदू त्राटक करावे काही अडचण येणार नाही.
👁दररोज बिंदू त्राटक केल्यावर आपली एकाग्रता वाढीस लागली आहे याचा अनुभव तुम्हाला येईल,तुमचे मन शांत होईल,चंचलता नाहीशी होईल.
मग काय*_*करा तयारी अभ्यासाची ॥
आहे की नाही जबरदस्त अभ्यास तंत्र...मग आजपासून आपण हे बिंदू त्राटक करून अभ्यासाला करणार सुरवात .. ...
विद्यार्थ्यांचे मनोगत
📕📒📘📗📙📕📒📘📗📙📕📒📘📗📙📕📒📘📗📙
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
धन्यवाद ! ! !*
आपला:
संतोष नन्नावार,पदवीधर शिक्षक
लोकविद्यालय तळोधी(बा)ता:नागभीड
जि:चंद्रपूर
Subscribe to:
Posts (Atom)
यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी
नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक. ...
-
महाराष्ट्र राज्य माध्य मिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये इ.१० वी साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वि...
-
इयत्ता ५वी ते १२ वी ची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे.या पार्श्वभूमीवर विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांना मानसशास्त्रीय मार्गदर्शन क...
-
शेतकऱ्याचा मुलगा सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर ● शाळेसाठी रोज १० किमी पायपीट, कर्ज काढून शिकत झाला IAS अधिकारी ●वीर प्रताप सिंह राघव सहाय्यक ...


