Tuesday, 27 July 2021

शिष्यवृत्ती परीक्षा होणार ९ ऑगष्ट रोजी; प्रवेशपत्र उपलब्ध

दि. ०८/०८/२०११ रोजी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने त्याकरीता शिष्यवृत्ती परीक्षेची केंद्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत. तसेच काही जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनचे कडक पालन करण्यात येत असल्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०८/०८/२०२९ ऐवजी सोमवार दि. ०९/०८/२०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.


Monday, 26 July 2021

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी CET परीक्षेची अवेदनपत्रे सोमवारी दुपारी ३.०० वाजता पासून सुरु

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय दि.२८ मे, २०२१ व दि.२४ जून, २०२१ नुसार इ.११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे (CET) आयोजन
करण्यात येत आहे. 

सदर परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र भरण्याची सुविधा दि.२०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, तांत्रिक कारणास्तव सदर सुविधा दि.२१/०७/२०२१ पासून बंद ठेवण्यात आली आहे.

इयत्ता ११ वी प्रवेशा संदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे सोमवार दि.२६.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून ऑनलाईन पध्दतीने 👉 https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा पुनःश्च उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर सुविधा दि.०२.०८.२०२१अखेर (रात्री११.५९) अखेर उपलब्ध असेल.

 मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल Access करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

संगणक प्रणालीमध्ये आवेदनपत्र भरण्यासाठी खालील माहिती
नोंदवावी लागणार आहे.

  •  ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास)
  • पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य आहे.
  • परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्यान सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास एक माध्यम निश्चित करावे लागेल.
  •  सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या/कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका/शहराचा विभाग (WARD) निश्चित करावा लागेल.
  • ज्या विद्यार्थ्यांनी इ.१० वीचे आवेदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा EWS हा प्रवर्ग निवडावा लागेल.

उपरोक्तप्रमाणे प्रथम आवश्यक माहिती निश्चित करून ठेवावी व तद्नंतर इ.११ वी प्रवेशासाठी आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे आबेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी.


दि.२०.०७.२०२१ ते दि.२१.०७.२०२१ या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशिल पूर्वीचा अर्ज क्रमांक (Application No.) व आवेदनपत्र भरतांना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून उपरोक्त संकेतस्थळावर पाहता येईल. सदर प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांचा तपशिल संकेत स्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.


सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा तपशिल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा सन २०२१ पूर्वी उत्तीर्ण/प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे. 

यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया बुधवार दि. २८.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तरी याबाबत संबंधीत विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी याची नोंद घ्यावी.


  • आवेदनपत्रे कधीपासून भरायला सुरुवात 

 सोमवार दि. २६.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून ऑनलाईन पध्दतीने  आवेदनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे.

  • आवेदनपत्र भरण्याची शेवटची तारीख 

आवेदनपत्र भरण्याची शेवटची तारीख दि.०२.०८.२०२१ (रात्री ११.५९) आहे.

  • आवेदनपत्र भरण्याची लिंक

आवेदनपत्र भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://cet.11thadmission.org.in


लोकविद्यालय तळोधी(बा) येथील माजी विद्यार्थ्यांनी केला गुणवंत व होतकरु विद्यार्थ्यांचा सन्मान..


  तळोधी(बा): दी रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी सन१९६० द्वारा संचालित लोकविद्यालय तळोधी(बा) येथे कोविड 19 नियमांचे पालन करून विद्यालयातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     येथील माजी विद्यार्थी डॉ.भास्कर सखारामजी आत्राम पुणे यांच्या वतीने  विद्यालयातील गरीब,होतकरु  व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याकरिता विद्यालयाला देणगी दिली.या देणगीतून विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व ट्रॉफी देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच विद्यालयातील माजी विद्यार्थी इंजि.प्रशांत काशिनाथजी बोरकर तळोधी(बा) यांच्या वतीने  इयत्ता 10 वीच्या गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना मदत स्वरूपात पाठ्यपुस्तकांचे संच विद्यालयाला उपलब्ध करून देण्यात आले.
        या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष स्थानी श्री.आर.बि. विधाते साहेब मुख्याध्यापक लोकविद्यालय तळोधी(बा),प्रमुख अतिथी सौ. पुष्पलताताई काशीनाथजी बोरकर समाजसेविका तळोधी(बा), राकेश लोधे सहा.शिक्षक भारत विद्यालय नवरगाव, जेष्ठ शिक्षक पि. यु. गिरडकर, उपस्थित होते.
     अध्यक्षीय भाषणात विधाते साहेब यांनी सांगितले की,आमच्या विद्यालयाने आजतागायत अनेक उच्च पदस्थ अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअरिंग, यशस्वी जबाबदार नागरिक समाजाला दिलेत.ते आज देशात व विदेशात कार्यरत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, शिस्त,साधना व नम्रता ठेवण्याचे आव्हान केले.
   मार्गदर्शनपर मनोगतात सौ. पुष्पाताई काशिनाथजी बोरकर  यांनी सांगितले की,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज्यांच्या वैचारिक प्रेरणेने प्रेरित होऊन समाजाभिमुख कार्य विद्यालयाच्या वतीने केले जात आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांने धार्मिक विचार,संस्कार आणि शिस्त  याचे पालन केल्यास सुजाण नागरिक होता येते.
यावेळी सहा. शिक्षक राकेश लोधे सर भारत विद्यालय नवरगाव,जेष्ठ शिक्षक प्रकाश गिरडकर ,रविंद्र निनावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा.शिक्षक संतोष नन्नावार, संचालन संजय घोडे व आभार रविंद्र हांडेकर यांनी मानले.
        सदर कार्यक्रमाला विद्यालयातील सहा.शिक्षक आर.एम.निनावे, ए. एन. कोहळे, कु.संगीता बालमवार, पी.बी. पाकमोडे, एम.व्ही.टोंगे,सोनल उंबरकर, ज्योती मोहूर्ले, अजय सगळाम, एकनाथ भगत, सुरेश कुंभरे, इतर शिक्षक, शिक्षिका,व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Saturday, 24 July 2021

मीराबाई चानु ....'लाकूडतोड ते ऑलिंपिक पदक!'


 मीराबाई चानु ....

'लाकूडतोड ते ऑलिंपिक पदक!'



   मीराबाई चा जन्म मणीपूर मधल्या एका खेड्यातला! 'लाकूड' हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडं आणण्यासाठी आपल्या भावंडांबरोबर जायची. सहा भावंडातली ती सर्वात लहान. पण येताना सर्वात जास्त लाकडं ती घेऊन यायची. तिनं आणलेली मोळी तिच्या मोठ्या  भावांनाही  उचलता येत नसे. तिची आई चाणाक्ष होती. आपल्या मुलीला वेटलिफ्टर बनवावं अशी तिची इच्छा होती. पण मीराला मात्र तिरंदाज व्हायचं होतं. मात्र आठवीच्या पुस्तकात तिनं मणीपूरच्याच कुंजराणी देवीवरचा धडा वाचला आणि तिचं जीवनाचं ध्येय ठरलं... वेटलिफ्टरच व्हायचं! 

  नंतर खडतर परिश्रम करत राज्य पातळीवर,  राष्ट्रीय पातळीवर तिनं उत्तम चमक दाखवली. आशियाई गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स , जागतिक चँपियनशिप अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिनं सुवर्णपदकं जिंकली. 

   पण सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणजे ऑलिंपिक ! 2015 च्या रिओ ऑलिंपिक मधे तीन प्रयत्नात ही वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिच्या कारकीर्दीला लागलेला हा फार मोठा डाग होता. 2015 नंतर तिनं वर नमूद केल्याप्रमाणे अनेक पदकं जिंकलेली असली तरी रिओ मधील अपयशाची भरपाई झाली नव्हती. 

      त्यातच तिला पाठीच्या दुखण्याचा जबरदस्त त्रास होऊ लागला. दोन-तीन दिवसातून एकदा सराव करणंही अशक्य झालं. तशात कोवीडचं संकट ! लॉकडाऊन मुळे प्रॕक्टिस पूर्णपणे बंद! करियर संपणार की काय अशी सर्वांना धास्ती वाटू लागली. पण केंद्र सरकारनं 71 लाख रुपये खर्च करुन तिला ट्रेनिंग आणि प्रॕक्टिस साठी अमेरिकेत पाठवलं.. ऑक्टोबर2020 मधे तिथल्या प्रशिक्षणाचे सुपरिणाम लवकरच दिसू लागले. दररोज सराव करणं शक्य होऊ लागलं. हळूहळू दिवसातून दोनदा सराव करायलाही जमू लागलं. तिची जिद्द, चिकाटी, मेहनत यावर प्रशिक्षक खूश झाले. 

... आणि पुन्हा एकदा मोठ्या परीक्षेचा दिवस उजाडला ... टोकियो ऑलिंपिक2021 ! यावेळी मीरा पूर्ण तयारीत होती. यावेळी रिओची पुनरावृत्ती घडणार नव्हती. 49 कि. गटात तिनं, 'क्लीन अँड जर्क' मधे 115 किलो वजन उचलून नवीन ऑलिंपिक रेकॉर्ड केलं आणि एकूण 202 किलो वजन उचलून तिनं 'सिल्व्हर मेडल' जिंकलं. संपूर्ण देशात आनंदाची लहर उमटली. 

जे हात  लाकडाची मोळी वाहून आणत होते तेच आज 'ऑलिंपिक पदक' अभिमानानं उंचावत आहेत. अतिशय प्रेरणादायी अशी ही जीवनकथा !

आता शालेय पुस्तकात मीराबाईच्याही जीवनावरचा एक धडा समाविष्ट झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

https://youtu.be/LaWYacUl964

 

source BBC हिंदी

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🏋🏼‍🏋🏼‍♀️🥈🥈🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

Friday, 23 July 2021

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय-शिक्षण विभाग

       सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.-मा.प्रा.वर्षाताई गायकवाड शिक्षणमंत्री (म.राज्य) यांनी tweeter वर पोस्ट करून माहिती दिली..


https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1418502285055782913?s=20

Source- tweeter

Monday, 19 July 2021

11 वी CET परीक्षेची तारीख जाहीर,21 ऑगस्ट ला CET परीक्षा होणार


 

मुंबई: दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, आता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान अकरावी सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. 20 जुलै सकाळी 11:30 पासून ते 26 जुलै पर्यंत परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आवेदन पत्र ऑनलाईन भरायचे आहे. 10 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सीईटी परिक्षेची आता वाट पाहत होते.

      राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार नाही. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येणार आहे

राज्य शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. सीईटी परीक्षा ऐच्छिक असणार असून 100 गुणांसाठी गणित, विज्ञान, समाजशास्त्र , इंग्रजी या चार विषयांचे प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे. परीक्षा बहुपर्यायी उत्तरांची असणार असून ओएमआर पद्धतीने घेतली जाणार आहे.

     नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. अंतर्गत मूल्यपामनद्वारे लागलेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्के, 100 टक्के गुण मिळाले. मात्र, इतके गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे दहावीमध्ये चांगले गुण मिळाले म्हणून हुरळून न जाता सीईटी परीक्षेत सुद्धा चांगले गुण मिळवण्यासाठीची तयारी करावी लागणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनद्वारे लागलाय. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना 90 टक्के टक्केच्या वरती गुण मिळालेत. मात्र, हे गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे नामांकित कॉलेज मिळणार नाहीये. कारण तुम्हला यंदाच्या वर्षी नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर अकरावी सीईटी परीक्षेत सुद्धा तुम्हाला चांगले गुण मिळवावे लागणार आहेत. कारण त्या गुणांच्या आधारेच मेरिट लिस्ट नुसार नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.

Source:ABPमाझा

सन २०२१-२२ इ ११ वी प्रवेश संदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परिक्षा (CET) करीता LINK


 

सन २०२१-२२ इ ११ वी प्रवेश संदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश
परिक्षा (CET) करीता LINK

http://cet.mh-ssc.ac.in

यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...