Sunday, 6 March 2016

[3/5, 4:36 PM] ‪+91 94042 30352‬: मनोजकुमार यांना 2015 चा दादासाहेब फाडके पुरस्कार जाहीर :-

*दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे

*इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या
जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात
आहे.

*हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व
नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.

*दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.

*१९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या
पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे. सन २००६पासून सुवर्णकमळ, १० लाख रूपये व शाल दिले जाते.

*जेष्ट अभिनेते तसेच निर्माते, दिग्दर्शक मनोजकुमार यांना 2015 सालचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाडके पुरस्कार देण्यात आला.


*त्यांचा जन्म  1937 रोजी  पाकिस्थानात असलेल्या अबोटाबाद मध्ये झाला.त्यांचे जन्माचे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते त्याना भारतकुमार टोपन नावाने ओडखले जात असे.


*1960 मधील "कांच की गुडिया" या चित्रपटाने चित्रपटसुष्ट्रीत पदार्पण केले.

*पुरस्कार;-

-सन 1992 मध्ये त्याना भारतसरकार पद्मश्री पुरस्कार मिळाला.

-सन 1972 मध्ये "बेईमान" या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फ़िल्म फेअर पुरस्कार मिळाला.

-सन 1968 मध्ये "उपकार" या चित्रपटाला दुसर्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

-सन 1999 मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

-सन 2008 मध्ये मध्यप्रदेश सरकारचा राष्ट्रीय किशोरकुमार पुरस्कार

-सन 2009 मध्ये फाळके रत्न पुरस्कार

-सन 2010 महाराष्ट्र सरकारचा राज कपूर पुरस्कार

*मागील काही पुरस्कार विजेते वक्ती:-

-पहिला पुरस्कार-देविका राणी-1969

-दुसरा पुरस्कार-बी.एन.सरकार-1970

-तीसरा पुरस्कार-पृथ्वीराज कपूर-1971

-45 वा पुरस्कार- कवि गुलजार-2013

-46 वा पुरस्कार-शशी कपूर-2014

-47 वा पुरस्कार-मनोजकुमार-2015


लेखन-समाधान निमसरकार
स्पर्धा परीक्षा लेखक/संचालक SAIMkatta
Mob-9422872805
[3/5, 4:36 PM] ‪+91 94042 30352‬: महत्त्वाचे पुरस्कार - 2015

1) कालीदास सन्मान पुरस्कार -

*अभिजात संगीत, नृत्य, नाटक आणि शिल्पकला या श्रेत्रात उत्सुंग कार्य करणाचा व्यक्तींना हा सन्मान मध्यप्रदेश राज्य सरकार तर्फे देण्यात येतो.

*पहिला पुरस्कार - 1980 सी.श्री.अय्यर  

*दोन लाख रुपये आणि सन्मासचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

*प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी कालीदास स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. (कालीदास पुस्तके - मेघदूत, रघुवंश, शृंगारनिलक) रंगभूमीवरील भरीव कामगिरीसाठी महेश एलकुंवार आणि जेष्ठ रंगकमी मोहन महर्षी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

*एक प्रयोगशिर नाटककार म्हणून एलकुंचवार यांची ओळख आहे. वाडा चिरेबंदी, सुलतान, होळी, यातनाघर, पार्टी, प्रतिबिंव, आत्मकथा, भग्न तळ्याकाठी या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती.

*मोहन महर्षी यांनी आषाढ का एक दिन, जोसेफ का मुकदमा, ऑथेल्लो, एवम इंद्रजीत नाटके प्रसिद्ध आहेत.

2) पणशीकर जीवनगौरव पुरस्कार -

*रंगभूमीवरील उत्त्कृष्ठ कामगिरी करणार्‍या श्रेष्ठ नाटककार राज्य शासनातर्फे हा पुरस्कार दिला जातो.

* 5 लाख रुपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र हे या पुरस्काराचे स्वरुप आहे. रंगभूमी दिनाच्या (5 नोव्हें) हा पुरस्कार सांस्कृतीकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रामकृष्ण नाईक यांना देण्यात आला.

*नाईक हे रायगडाला जाग येते तेव्हा, लेकरे उदंड झाली, अखेरचा सवाल, बॅलीस्टर इत्यादी नाटके सादर केली आहेत.

3) अण्णासाहेब किलोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार-

*संगीत रंगभूमीवर उत्त्कृष्ट कामगिरी करणार्‍या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी सांस्कृतीक कार्य मंत्रालय महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो.

*5 लाख रूपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र हे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

*या पुरस्काराची सुरवात 2009 पासून असून पहिला पुरस्कार फैयाज शेख यांना देण्यात आला होता.

*2015 साठी हा पुरस्कार रजनी जोशी यांना देण्यात आला आहे. त्यांनी सौभद्र, स्वंयवर, मृच्छकटिक इत्यादी नाटकात भूमीला साकारल्या आहेत.

4) गदिमा पुरस्कार -

*गदिमा प्रतिष्ठान चा मानाचा समजला जाणारा गदिमा पुरस्कार पार्श्‍वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे.

*21 हजार रुपये व सन्मानचिन्ह या पुरस्काराचे स्वरूप आहे. किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

5) तन्वीर सन्मान पुरस्कार -

*नाट्यक्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी रुपवेध प्रतिष्ठानातर्फे देण्यात येणारा तन्वीर सन्मान 2015 साठी जेष्ठ रंगकर्मी अ‍ॅलेक पद्मसी यांना जाहीर झाला आहे. तर प्रकाश योजनाकार प्रदिप मुळे यांना नाट्यकर्मी पुरस्कारातर्फे गौरविण्यात आले आहे.

*तन्वीर पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये व नाट्यकर्मी पुरस्काराचे स्वरूप तीस हजार रुपये आहे.

6) टिळक राष्ट्रीय पत्रकारीता पुरस्कार -

*केसरी मराठा संस्थेतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकरिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांना जाहीर झाला आहे.

*1 लाख रुपये या पुरस्काराचे स्वरुप आहे.  पत्रकारितेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची कामगिरी केलेल्या पत्रकाराला हा पुरस्कार देण्यात येतो.

*आतापर्यंत वीर संघवी, एन राय, एच के हुआ इत्यादींना हा पुरस्कार दिला आहे.

7) वसुंधरा सन्मान पुरस्कार -

*किलोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा यंदाचा वसुंधरा पुरस्कार पर्यावरण तज्ज्ञ डॉ. वंदना शिवा यांना देण्यात आला.

*तर पर्यावरण विषयक लेखक विटटू सहगल यांना जिवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

8) विष्णूदास भावे पुरस्कार -

*मराठी, रंगभूमीचे जनक विष्णूदास भावे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार रंगभूमी दिनानिमित्त दिला जातो.

*अखिल भारतीय नाट्य संम्मेलनाच्या अध्यखा फैयाज शेख यांच्या हस्ते विक्रम गोखले यांना देण्यात आला.

9) यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार-

*सांस्कृतीक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात कार्यातून श्रेष्ठमापदंड प्रस्थापित केल्याबद्दल हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई तर्फे दिला जातो.

*रोख दोन लाख रूपये व सन्मानचिन्ह या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावर्षी हा पुरस्कार कृत्रीम पायाच्या आधारे एव्हरेस्ट शिखर करण्याचा अरुणिया सिन्हा यांना देण्यात आला आहे.

10) दिनानाथ मंगेशकर पुरस्कार -

*दिनानाथ मंगेशकर याच्या स्मृृतीपित्यर्थ हा पुरस्कार प्रदिर्घ नाट्यसेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार चित्रपट अभिनेते प्रशांत दाखले यांना देण्यात आला आहे.

11) विंदा करंदीकर पुरस्कार -

*मराठी साहित्य क्षेत्रात भरीव मोलाची कामगिरी करणारे जेष्ठ समीक्षक व लेखक रा.ग. जाधव यांना 2015 चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

*साहित्य व प्रकाशन क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍यांना देण्यात येणाचा पुरस्काराची निवड करण्यात आलेल्या समीतीने रा.ग.जाधव यांची निवड केली असून या पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये आहे.

* प्रा. जाधव यांची निळी पहाट, संध्यासमर्याच्या गुजगोष्टी, समीक्षेतील अवतरणे, साणेत्तरी मराठी कविता व कवी, साहित्याचे परीस्थिती विज्ञान इत्यादी अनेक पुस्तके प्रकाशित आहे.

*यांनी औरंगाबाद येथे 2004 मध्ये झालेल्या आखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच याच वेळी पूर्ण येथील कॉन्टिनेन्टल प्रकाशन या प्रकाशन संख्येला श्री पु. भागवत पुरस्कार मिळाला असून त्या पुरस्काराचे स्वरुप 3 लाख रुपये व मानचिन्ह आहे.

इतर पुरस्कार -

12) लोकमान्य टिळक पत्रकरिता (म.रा.)- डॉ. मुज्जफर हुसेन

13) वि.दा.पुरस्कार - द.मा.मिरासदार हृदयनाथ

14) मंगेशकर पुरस्कार - ए.आ.रहमान


लेखन-समाधान निमसरकार
स्पर्धा परीक्षा लेखक/संचालक SAIMkatta
Mob-9422872805

यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...