Saturday, 28 August 2021

*धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना*

इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
🔸 पात्रतेचे निकष 
🔸आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
🔸मुख्याध्यापक यांनी माहिती भरण्याची प्रक्रिया 

सविस्तर माहितीसाठी:- संचालक,अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय यांचे पत्र 👇

Saturday, 7 August 2021

इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक

     नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्ण पदकावर नाव कोरत इतिहास घडवला.

2008 मध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत देशाला पहिलं वहिलं वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. नीरज आता या मांदियाळीत दाखल झाला आहे.

   अॅथलेटिक्स प्रकारातलं हे भारताचं पहिलंवहिलं पदक आहे.

    टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय आव्हानाच्या अखेरच्या दिवशी (शनिवारी, ७ ऑगस्ट) भारताचा अखेरचा ऍथलिट भालाफेकपटू नीरज चोप्रा सहभागी होत होता. सर्व भारतीयांना त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. त्याने ही अपेक्षा पूर्ण करत भारताला ऑलिम्पिक इतिहासात ऍथलेटीक्स प्रकारात पहिलेवहिले पदक मिळवून दिले.
त्याने या ऑलिम्पिकमधील भारताचे पहिले व इतिहासातील दुसरे सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.

अशी केली ती ऐतिहासिक कामगिरी
पात्रता फेरीत ८६.६५ मिस्टर भालाफेक करून नीरजने अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये ८७.०३ मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत ८७.५८ मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो ७६.७९ मीटरची फेक करू शकला.
अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये ८४.०२ मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी ८७.५८ मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.
या खेळाडूंना मिळाले रौप्य व कांस्य पदक
नीरजने सुवर्णपदक पटकावल्यानंतर रौप्य पदकावर चेक रिपब्लिकच्या जाकुबने ८६.६७ मीटर भाला फेकून आपला हक्क सांगितला. कांस्य पदक त्याचाच संघ सहकारी वेस्ली याने ८५.४४ मीटर भाला फेकून आपल्या नावे केले.

Thursday, 5 August 2021

टोकियो ऑलिंपिक : 41 वर्षांनंतर हॉकीमधील पदकाचं स्वप्न साकार, जर्मनीला पराभूत करत कांस्य पदक

टोकयो, 5 ऑगस्ट : भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मेडलची 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. भारताने 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्यानंतर तब्बल 41 वर्षांनी भारतानं ऑलिम्पिकमध्ये हॉकीत मेडल मिळवले आहे. या मॅचमध्ये जर्मनीनं आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्याच मिनिटाला जर्मनीच्या ऊरजनं फिल्ड गोल करत 1-0 नं आघाडी मिळवली. भारताला 5 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र रुपिंदर पाल सिंह गोल करण्यात अपयशी ठरला. दोन्ही टीम सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत होत्या. सातव्या मिनिटाला जर्मनीचा गोल करण्याचा प्रयत्न गोलकिपर श्रीजेशनं उधळला.
पहिल्या क्वार्टरनंतर जर्मनीकडं 1-0 अशी आघाडी होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 5 गोल जर्मनीच्या टीमनं 2008 आणि 2012 ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. तर 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. भारतीय टीमला 41 वर्षांपासून ऑलिम्पिक मेडलची प्रतीक्षा आहे.

या मोठ्या फरकानंतरही भारतीय टीमनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये जोरदार खेळ केला. सिमरनजीत सिंहनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर 24 व्या मिनिटाला जर्मनीच्या निकोलस वेलननं गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनीच जर्मनीनं आणखी एक गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली.

भारतीय टीमनं 2 गोलच्या पिछाडीनंतरही जिद्द सोडली नाही. हार्दिक सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीची आघाडी 2-3 नं कमी केली. त्यानंतर हरमनप्रीत सिंहनं गोल करत सामना 3-3 ने बरोबरीत आणला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 5 गोल झाले.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची आघाडी भारतीय टीमनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये तीन मिनिटात दोन गोल करत बरोबरी साधली होती. तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने जोरदार सुरुवात केली. भारताकडून 29 व्या मिनिटाला रुपिंदर सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत मॅचमध्ये पहिल्यांदाच टीमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 5 मिनिटांनीच सिमरनजीत सिंहनं गोल करत 5-3 अशी आघाडी घेतली.

हा भारताचा मॅचमधील सलग चौथा गोल होता. त्यानंतर जर्मनीनं काही पेनल्टी कॉर्नर मिळवले. त्या पेनल्टीचं गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना अपयश आले.
चौथ्या क्वार्टरमध्ये भारताच्या बचाव फळीतील चुकांचा फायदा घेत जर्मनीनं चौथा गेला. जर्मनीकडून लुकासनं हा गोल केला. त्यानंतर मनदीप सिंहला गोल करण्याची एक संधी साधता आली नाही. मात्र भारतानं अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत ऑलिम्पिक मेडलवर शिक्कामोर्तब केलं.
Source :Ibn lokmat

Monday, 2 August 2021

इ.१२वीचा निकाल उद्या..👍

📢 महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२वीचा निकाल उद्या दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु. ४ : ०० वा. जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा! परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संपादित केलेले विषयनिहाय गुण खालील संकेतस्थळावर उद्या दुपारी ४.०० नंतर उपलब्ध होतील:
  https://msbshse.co.in https://hscresult.11thadmission.org.in www.hscresult.mkcl.org www.mahresult.nic.in https://lokmat.news18.com उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...