नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.
लोकेश मोहूर्ले व मोसम मोहूर्ले
◆ दोन्ही विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेत मिळविले उज्वल यश. ◆ शेतकऱ्यांच्या मुलांनी मोठं केलं ओवाळा या गावाच नाव.
◆दोघेही लोकविद्यालय तळोधी (बा) येथील माजी विद्यार्थी.
●MPSC(महाराष्ट्र लोकसेवा आयोग)परीक्षेत मिळविले यश
यशोगाथा: शेतकऱ्यांच्या मुलांचे MPSC परीक्षेत यश
१)लोकेश शालीकजी मोहूर्ले:(STI)
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत 11 महिन्यापूर्वी जाहीर झालेल्या निकालात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब मुख्य परीक्षा 2021 च्या राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी या दोन्ही परीक्षांमध्ये नागभीड तालुक्यातील ओवाळा या छोट्या गावातील लोकेश शालिकजी मोहुर्ले,याने उत्तुंग यश मिळवले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील शेतकरी शालिक उष्टुजी मोहुर्ले यांचा मुलगा लोकेश मोहुर्ले (वय ३१ वर्ष).त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण लोकविद्यालय तळोधी(बा) येथे झाले. त्यानंतर त्याने नेवजाबाई हितकर्णी ब्रम्हपुरी कॉलेजमध्ये 12 इयत्तेसाठी प्रवेश घेतला. त्यानंतर DIET कॉलेज चंद्रपूर येथून डी.एड पूर्ण केले. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर मधुन उच्च शिक्षण घेतले आणि B.A पूर्ण केले, त्यानंतर ते पुण्याला भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गासाठी गेले.
2015 पासून त्याने एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली परंतु सुरुवातीला त्याला यश मिळू शकले नाही.पण त्यानंतरही त्याने सतत प्रयत्न केले आणि 2 परीक्षा यशस्वीपणे पास करून उत्तुंग यश मिळविले.राज्य कर निरीक्षक या पदावर ते रुजू झाले.
२)मोसम ज्ञानेश्वरजी मोहूर्ले(PSI):
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर झालेल्या निकालात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब मुख्य परीक्षा 2020 च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. नागभीड तालुक्यातील ओवाळा या गावातील शेतकऱ्याचा मुलगा PSI मोसम ज्ञानेश्वरजी मोहूर्ले (वय 27 वर्ष) यांने दाखवून दिलं की प्रतिभा आणि श्रीमंती यांचा काहीही संबंध नाही. बालपणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आयुष्य व्यतीत करत पोलीस उपनिरीक्षक पदाची (PSI)मुख्य परीक्षा उत्तीर्ण करत त्याची निवड झाली आहे.
नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील शेतकरी ज्ञानेश्वर श्रावण मोहूर्ले यांचा मुलगा मोसम मोहुर्ले.त्याचे प्राथमीक शिक्षण जि.प.शाळा ओवाळा येथे पूर्ण केले.पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण लोकविद्यालय तळोधी(बा) ता.नागभीड जि.चंद्रपूर येथे झाले. त्यानंतर त्याने यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय तळोधी(बा) येथे इयत्ता 12 वी ते पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी करण्याचे त्याने ठरविले. स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी त्याने पुणे येथे लायब्ररीत अभ्यास करून तयारी सुरू केली.परिस्थिती बेताची असल्याने नंतर त्याने नागपुर येथे पुढील तयारी करण्यास सुरुवात केली.
एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली परंतु सुरुवातीला त्याला यश मिळू शकले नाही.पण त्यानंतरही त्याने सतत प्रयत्न केले आणि परीक्षा यशस्वीपणे पास करून उत्तुंग यश मिळविले.
मोसम मोहूर्ले याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सामान्य असल्यामुळे त्यांचं बालपण परिस्थितीशी सामना करत गेला. मोसम यांच्या मार्गात अनेक अडथळे असूनही त्यांनी आपल्या लक्ष्याचा पाठपुरावा केला. मोसम ज्ञानेश्वरजी मोहूर्ले याने मेहनतीच्या जोरावर MPSC परीक्षेत उत्तम यश मिळवले.
त्यांच्या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.







.jpeg)
