येत्या १० एप्रिल रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे व दरवर्षी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांमध्ये, ‘फ्रेशर्स’ म्हणता येईल अशा नव्या उमेदवारांइतकेच किंबहुना, त्यापेक्षा अधिक जुने म्हणजेच ‘रिपीटर’ उमेदवार असतात. एक-दोन-तीन किंवा त्यापेक्षा कमी-जास्त प्रयत्नांचा अनुभव असणाऱ्या अशा उमेदवारांचे, अभ्यासाच्या रणनीतीबद्दल स्वत:चे असे काही आडाखे असतात. कोणत्या घटकविषयाला जास्त महत्त्व द्यावे, कोणत्या संदर्भ पुस्तकांना हाताळावे, कोणत्या पुस्तकातून कोणता भाग अभ्यासावा या विषयी नेमके धोरण असते. एक-दोन परीक्षांमधील यशापयशाच्या अनुभवातून येणारे हे शहाणपण फार मोलाचे असते आणि ते उपयुक्तही ठरते. पण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाविषयी योग्य दृष्टिकोन विकसित झाला असेल तर या दृष्टिकोनाच्या निकषांवरच पूर्वानुभवाचे ज्ञान उपयुक्त ठरते अथवा आपली रणनीती तपासून घ्यावी लागेल. http://loksa.in/NSH225454
