Monday, 1 August 2022
राष्ट्रकुलमध्ये भारताला दुसरं गोल्ड मेडल; जेरेमी लालरिनुंगाची सोनेरी कामगिरी
राष्ट्रकुलमध्ये भारताला दुसरं गोल्ड मेडल; जेरेमी लालरिनुंगाची सोनेरी कामगिरी
बर्मिंगहम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आज पाचवं पदक मिळालं आहे. जेरेमी लालरिनुंगा याने पुरुषांच्या वेटलिफ्टिंग ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. १९ वर्षीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिननुंगा यानं कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलंय. कॉमनवेल्थ गेम्समध्ये हे भारताला मिळालेलं दुसरे गोल्ड मेडल आहे.
जेरेमी लालरिनुंगाने एकूण ३०० किलो वजन उचलून विक्रम केला. भारताला मिळालेलं हे दुसरे सुवर्णपदक असून स्पर्धेतील एकूण पाचवे पदक आहे. विशेष म्हणजे ही पाचही पदके भारतानं वेटलिफ्टिंग स्पर्धेतच मिळवली आहेत.
२०१८ च्या युवा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या जेरेमी लालरिननुंगानं स्नॅचमध्ये विक्रमी १४० किलोग्रॅम वजन उचलले, तर त्यानं क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचललं. म्हणजेच जेरेमीनं एकूण ३०० किलो वजन उचललं. जे दुसऱ्या क्रमांकाच्या समोआ या प्रतिस्पर्ध्यापेक्षा ७ किलोहून अधिक होते.
भारताला एकूण ५ मेडल
वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आतापर्यंत एकूण ५ मेडल्स मिळाले आहेत. मीराबाई चानूने गोल्ड मेडल, संकेत सरगर आणि बिंदियाराणी यांनी सिल्वर मेडल तर गुरुराजाने ब्रॉन्ज मेडल पटकावलं आहे.
source:OTT News
Subscribe to:
Posts (Atom)
यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी
नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक. ...
-
महाराष्ट्र राज्य माध्य मिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये इ.१० वी साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वि...
-
इयत्ता ५वी ते १२ वी ची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे.या पार्श्वभूमीवर विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांना मानसशास्त्रीय मार्गदर्शन क...
-
शेतकऱ्याचा मुलगा सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर ● शाळेसाठी रोज १० किमी पायपीट, कर्ज काढून शिकत झाला IAS अधिकारी ●वीर प्रताप सिंह राघव सहाय्यक ...
