तळोधी(बा): दी रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी सन१९६० द्वारा संचालित लोकविद्यालय तळोधी(बा) येथे कोविड 19 नियमांचे पालन करून विद्यालयातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील माजी विद्यार्थी डॉ.भास्कर सखारामजी आत्राम पुणे यांच्या वतीने विद्यालयातील गरीब,होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याकरिता विद्यालयाला देणगी दिली.या देणगीतून विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व ट्रॉफी देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच विद्यालयातील माजी विद्यार्थी इंजि.प्रशांत काशिनाथजी बोरकर तळोधी(बा) यांच्या वतीने इयत्ता 10 वीच्या गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना मदत स्वरूपात पाठ्यपुस्तकांचे संच विद्यालयाला उपलब्ध करून देण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष स्थानी श्री.आर.बि. विधाते साहेब मुख्याध्यापक लोकविद्यालय तळोधी(बा),प्रमुख अतिथी सौ. पुष्पलताताई काशीनाथजी बोरकर समाजसेविका तळोधी(बा), राकेश लोधे सहा.शिक्षक भारत विद्यालय नवरगाव, जेष्ठ शिक्षक पि. यु. गिरडकर, उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात विधाते साहेब यांनी सांगितले की,आमच्या विद्यालयाने आजतागायत अनेक उच्च पदस्थ अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअरिंग, यशस्वी जबाबदार नागरिक समाजाला दिलेत.ते आज देशात व विदेशात कार्यरत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, शिस्त,साधना व नम्रता ठेवण्याचे आव्हान केले.
मार्गदर्शनपर मनोगतात सौ. पुष्पाताई काशिनाथजी बोरकर यांनी सांगितले की,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज्यांच्या वैचारिक प्रेरणेने प्रेरित होऊन समाजाभिमुख कार्य विद्यालयाच्या वतीने केले जात आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांने धार्मिक विचार,संस्कार आणि शिस्त याचे पालन केल्यास सुजाण नागरिक होता येते.
यावेळी सहा. शिक्षक राकेश लोधे सर भारत विद्यालय नवरगाव,जेष्ठ शिक्षक प्रकाश गिरडकर ,रविंद्र निनावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा.शिक्षक संतोष नन्नावार, संचालन संजय घोडे व आभार रविंद्र हांडेकर यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला विद्यालयातील सहा.शिक्षक आर.एम.निनावे, ए. एन. कोहळे, कु.संगीता बालमवार, पी.बी. पाकमोडे, एम.व्ही.टोंगे,सोनल उंबरकर, ज्योती मोहूर्ले, अजय सगळाम, एकनाथ भगत, सुरेश कुंभरे, इतर शिक्षक, शिक्षिका,व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.